राज्यस्तरीय युवा कार्निवल शिबिरात भंडारा जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाचे स्थान
प्रदीप घाडगे मुख्य संपादक
भंडारा:भारत स्काउट्स आणि गाईडच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्स्वानिमित्त महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाइड्स राज्य कार्यालय मुंबई च्या वतीने राज्य स्तरावरील युवा कार्निवलचे आयोजन, जीएमडी ज्युनियर/सिनर महाविदयालय, ता. सिन्नर जि-नाशिक येथे दिनांक ०७ ते ११ ऑक्टोंबर, २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. या युवा कार्निवल शिबिरात भंडारा जिल्ह्यातील १२ स्काउट्स, ०९ गाइड्स व यूनिट लीडर म्हणून हेमंतकुमार मलेवार, शुभम भुरे, निकिता निपाने, पियुष निपाणे यांच्या नेतृत्वात स्काऊट गाइड नी सहभाग नोंदविला. या शिबिरामधे जिल्हा प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, पारंपारिक रॅम्प वॉक, फूड कोर्ट, लोकनृत्य, युवा मंच, कॅम्प फायर, हायकिंग, ट्रॅकिंग या सारखे स्पर्धा घेण्यात आले होते. *युवा कार्निवल शिबिरात भंडारा जिल्ह्यला द्वितीय क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले.* शिबिराचे शिबिर प्रमुख मोहन गुजरकर, राज्य संघटन आयुक्त स्काऊट अरुण सपताळे, राज्याचे अधिक्षक संतोष दुसाने, जिल्हा संघटक स्काउट श्रीनिवास मुरकुटे, जिल्हा संघटक गाईड कविता वाघ, अहमदनगर चे जिल्हा संघटक गाईड सोनाक्षी तेलांदे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट नवनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण झाला. भंडारा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के, जिल्हा संघटक स्काउट देवेंद्र अरमळ, जिल्हा संघटक गाईड रुपाली सूर्यवंशी, जेसीस कॉन्वेंट येथील प्राचार्या रंजना दारवटकर यांनी स्काऊट गाईड चे अभिनंदन केले व परतीच्या प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या.