पवन विद्यालय पवनी येथे शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
पवन विद्यालय पवनी येथे शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
पवनी/ पवन विद्यालय, पवनी येथे स्नेह संमेलना निमित्य शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड .एकनाथ बावनकर, क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक विद्यापीठ स्तरीय कबड्डी क्रीडा खेळाडू विलास येलमुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक चक्रधर मेश्राम, देवराज बावनकर, क्रीडा शिक्षक राजेश येलसट्टीवार, गजानन जाधव, सुरेश अवसरे, संगीता बावनकर,, भूमेश्वरी तेलमासरे, कोमल धकाते, मेहविश शेख, पल्लवी हरडे, अजय वाकडीकर, डोमेश्वर नागपुरे, या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनीय सामन्यात वर्ग 9वा व वर्ग दहावी या वर्गाअंतर्गत सामना घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चक्रधर मेश्राम यांनी केले. संचालन क्रीडा शिक्षक राजेश येलसट्टीवार यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन जाधव यांनी केले..