वाचन संस्कृती टिकली पाहिजे ही काळाची गरज : दिपक गरूड
पवनी येथे तालुकास्तरीय ग्रंथ दिंडी प्रदर्शन व महावाचन उत्सवाचे उद्घाटन
प्रदीप घाडगे मुख्य संपादक
पवनी:-दि.३०/. राष्ट्राच्या विकासासाठी वाचन संस्कृती शिक्षक,पालक व विद्यार्थी तसेच समाजात प्रचार व प्रसार होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन पवनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिपक गरुड यांनी तालुकास्तरीय ग्रंथ दिंडी प्रदर्शन व महावाचन उत्सवाचे उद्घाटन प्रसंगी केले.
पं.स.पवनीतर्फे तालुकास्तरीय ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन उत्सवाचे आयोजन दि.३० ऑगस्ट रोजी नगरपालिका विद्यालय पवनी येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी, दिपक गरुड,प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक, शेखराम गभने,वैनगंगा विद्यालयाचे प्राचार्य पराग टेंभेकर,नगरपालिका विद्यालयाचे प्राचार्य किशोर डांगे प्रथम फाउंडेशनचे समन्वयक किशोर वाघमारे,विनोबा अॅपचे समन्वयक निलेश गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी विद्येची देवता माता सरस्वती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.नगरपालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समग्र शिक्षा कर्मचारी वृंद व शिक्षकांनी केले.कार्यक्रमा दरम्मान शासन स्तरावरून संपूर्ण महाराष्ट्रात वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याचे दिशा निर्देश असतांना;राष्ट्राच्या विकासासाठी वाचन संस्कृती शिक्षक,पालक व विद्यार्थी तसेच समाजात प्रचार व प्रसार होणे काळाची गरज आहे.तालुक्यातील एकूण १५ शाळांनी पुस्तके तथा विविध वाचन साहित्य व ग्रंथाचे प्रदर्शन लावून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. वाचनाचा जागर तथा वाचनाचे महत्व,शाळा समाज व गाव यांना कळावे यासाठी पवनी नगरीतून ग्रंथ दिंडीचे आयोजन सकाळी नऊ वाजता करण्यात आले. यामध्ये ३९० विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. तसेच ग्रंथाचे खुले प्रदर्शन पाहण्यासाठी ९०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शनात तालुक्यातील पुस्तके तथा विविध साहित्य लावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.पवनी नगरीच्या मुख्य मार्गाने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 300 विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला.तसेच पवनी तालुक्यातील अनेक विद्यालयांनी प्रदर्शन पाहण्यासाठी तोबा गर्दी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती मंजुषा दलाल यांनी तर प्रास्ताविक डॉ. मुरलीधर रेहपाडे यांनी केले.आभार प्रदर्शन विषय साधन व्यक्ती भोजराज पडोळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेश येलशेट्टीवार,अशोक गिरी जगदीश देशमुख,प्रदीप घाडगे,चंद्रशेखर इखार, कुणाल बोरकर,विवेक गायधने नरेश तलमले व समग्र शिक्षा कर्मचारी वृंद दिपाली बोरीकर,महेंद्र वाहने, रत्नदीप लोणारे, भोजराज पडोळे,हिमाल तिबु़डे,संजय नंदुरकर, विठ्ठल रामटेके,विना गजभिये,जनाबाई हेमने यांनी मोलाचे सहकार्य केले.
∼