भंडाराच्या विवेक चटप व केतन खोब्रागडे यांची पंच म्हणून निवड
- विवेक चटप व केतन खोब्रागडे यांची राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेकरिता पंच म्हणून निवड
भंडारा :- ३५ वी ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेकरिता पंच आट्यापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन शेगाव ( बुलढाणा) येथे करण्यात आले आहे. त्यात राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेकरिता पंच म्हणून भंडारा येथील विवेक केशव चटप व केतन खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी केली आहे. विवेक केशव चटप हा भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात बी. ए. व्दितीय वर्षांला शिक्षण घेत आहे.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय ऑल इंडिया आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. व्हि. डी. पाटील, महासचिव डॉ. दिपक कविश्वर, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, संस्था अध्यक्ष राजेश धूर्वे, सचिव श्याम देशमुख, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. भिमराव पवार, रोमी बिष्ट यांना दिले आहे. असून त्यांचे शिवशंकर नागपुरे, आयर्न मरसकोल्हे तसेच भारतीय टीमची कर्णधार प्राची चटप, अश्वीनी साठवणे तसेच आटयापाट्या खेळातील सर्व अवार्ड प्राप्त खेळाडू तसेच आजी- माजी खेळाडू व आपल्या आई- वडीलांनी अभिनंदन केले आहे.