अड्याळ येथे हजारो रुग्णांनी घेतला दमा औषधीचा लाभ
*अड्याळ येथे हजारो रुग्णांनी घेतला दमा औषधीचा लाभ*
श्री पंकज वानखेडे कार्यकारी संपादक
पवनी तालुक्यातील जागृत हनुमंत देवस्थान अड्याळ येथे शरद पौर्णिमेच्या शुभपर्वावर (१६ ऑक्टोबर २०२४) जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील हजारो दमा रुग्णांनी मोफत दमा औषध वाटपाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला श्री हनुमान देवस्थान पंच कमिटी चे नीलकंठ गभने ,अण्णा जी कोलावार, अशोक सलुजा , रविभाऊ टेपलवार, सुरेंद्र देवईकर, राजू रोहनकर , रिंकू सलुजा, प्रदीप आंबीलकर,नितीन वरगंटीवार , मनोज कोवासे , विवेक क्षीरसागर , धनंजय मुलकलवार , पंकज वानखेडे ,सरपंच शिवशंकर मुंगाटे तथा ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान , जाबु शेख व गावातील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
अड्याळ येथील जागृत हनुमंताच्या मंदिरात गेल्या पंधरा वर्षापासून विनामुल्य दमाची औषध वितरण केल्या जाते. या
वर्षाला जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील दमा रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. अड्याळ येथील अशोक सलुजा यांनी चित्रकुट येऊन आणलेली आयुर्वेदिक औषधी देशी गायीचे दूध वतांदळाची खिर मातीचे भांड्यामध्ये चुलीवर रान गोवऱ्याच्या इंधनाने शिजवून त्या खिरमध्ये औषधी दिली जाते. या औषधाने बऱ्याच रुग्णांना
समाधान झाल्याने या औषधीसाठी दरवर्षी औषधी घेणाऱ्यांमध्ये वाढहोत आहे. औषधी वितरण
झाल्यानंतर सर्वांना परहेजबद्दल माहिती राजू रोहनकर यांनी दिली.