*अड्याळ येथे मोफत दमा औषध वितरण*
🎤 पंकज दिलीपराव वानखेडे कार्यकारी संपादक
📲 ९९ २३ १६ ७१ २० ::
अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत देवस्थानच्या भव्य प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शरद पौर्णिमेच्या ( कोजागिरी ) १६ ऑक्टोबर २०२४ रोज बुधवार ला रात्री १२ : ०० वाजता या दिवशी हनुमान देवस्थान पंचकमितीच्या वतीने मध्यरात्रीला गर्भगृहात विशेष पूजा करून मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली दम्याची औषध वितरण करण्यात येणार आहे.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णांनी बुधवारी मोफत दमा औषधीच्या लाभ घ्यावा, असे हनुमान देवस्थान पंचकमितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. देवस्थानात मोफत दमा औषधीचे वितरण अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. कोरोना काळ वगळता आजही नित्यनेमाने हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. येथे येणारे हजारो दमा रुग्ण त्यांना फायदा झाल्याचे सांगतात . मागील वर्षीपेक्षा यंदा वन औषधीच्या लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी नोंद करावे , असे आवाहन नीलकंठ गभने, अशोक सलुजा,हेमंत शृंगारपवार , रवी टेप्पलवार , राजू रोहनकर, रिंकू सलुजा, व समस्त पदाधिकारी / सदस्य हनुमान देवस्थान तथा महादेव देवस्थान अड्याळ यांनी सांगितले आहे.