अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी:आयुक्त अभय यावलकर
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी:आयुक्त अभय यावलकर
शासकीय नोकरीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी शासन आपल्याला पगार देते. याची जाणीव ठेवून शासकीय कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना वेळेत व आनंदाने सेवा द्यावी. नागरिकांसोबत आपली वागणूक सौजन्याची ठेवावी, अशा सूचना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त मा. श्री. अभय यावलकर यांनी दिल्या. तहसिल कार्यालय पवनी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेले विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी भंडारा . गजेंद्र बालपांडे, नागपूर येथील राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव (अ.का.) सुनील कांबळे, तहसीलदार पवनी महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी . दिपक गरुड, तालुका कृषी अधिकारी . आदित्य घोघरे, गट शिक्षण अधिकारी शरदचंद्र शर्मा, पशुधन विकास अधिकारी पं. स. पवनी डॉ. सचिनकुमार भोयर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक मेश्राम, पोलीस निरीक्षक अड्याळ, श्री. धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक पवनी, निलेश ब्राम्हणे, क्षेत्र सहायक वन विभाग पवनी, . ईश्वर एच. काटेखाये, सहायक निबंधक सहकारी संस्थाचे, रंजना सोनटक्के, बाल विकास प्रकप अधिकारी एस.बी. बावनकुळे, विद्युत वितरण कंपनी चे अभियंता . एस. के. गजभीये, उपअधिक्षक भुमीअभिलेख पवनी . से. वा. कापसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकर कैकाडे, विस्तार अधिकारी . अर्चना शहारे, दुययम निबंधक पवनी. प्रविण तोमर, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी न. प. पवनी मो. आरीफ शेख आदीसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
. आयुक्त अभय यावलकर म्हणाले, शासकीय कार्यालयातुन नागरीकांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा तात्काळ देण्याबाबत तसेच नागरीकांसोबत सौजन्याची वागणूक देण्याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाला त्यांचेकडे उपलब्ध असलेले सुविधांना वाढविण्याबाबत कळविले. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याकरीता संकल्पना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार सेवेचा तक्ता कार्यालयाचा दर्शनी भागास लावण्याचे तसेच प्रमाणपत्राला लागणारे दस्तांची माहिती दर्शनी भागास लावण्यास कळविले आहे. लोकसेवा हक्क अधिनीयम २०१५ अंतगर्त देण्यास येणाऱ्या सेवांची पुर्तता त्याच दिवशी पुर्ण करण्याचे निर्देश दिले. आपले सरकार सेवा केंद्रचालकांना पोर्टलबाबत प्रशिक्षण देण्यास कळविले. तालुक्याच्या ठिकाणी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र उभारुन त्यामध्ये सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरविण्याबाबत मार्गदर्शन केले. नागरीकांकडून आपले सेवा केंद्र यांमध्ये अपिलाची माहीती असल्याबाबतचे फॉर्मा भरून घेणे. कृषी विभाग व विद्युत विभाग यांनी समन्वय साधुन गरजू शेतकऱ्यांना सोलर वाटर पंप ची सेवा पुरविणे. घरगुती व शेती कनेक्शन ३० दिवसात देणे बाबत निर्देश दिले. तसेच इतर विभागांनी शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याची प्रभावी
अंमलबजावणी करावी, तसेच शासकीय सेवेत असे पर्यंत लोकांचे समाधान करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करावे असे सांगीतले. सदर कार्यक्रम दौरा प्रंसगी मा. आयुक्त श्री. अभय यावलकर भाप्रसे (से.नि.) राज्य लोकसेवा हक्क आयुक्त यांनी तालुक्यातील विविध विभाग यांचे कार्यालयाची तपासणी केली असता संबंधित विभाग नगर परीषद पवनी या कार्यालयास भेट दिली असता रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास तसेच इतरही योजनाचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. नागरीक व विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले वेळेत विहीत कालावधीत मिळाले पाहीजे असे निर्देश दिले. तसेच प्रमाणपत्र वाटपासाठी तालुका स्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा आपला प्रयत्न असावा. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत लोकसेवा हक्क कायद्याचे फलक लावावे. लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहे की नाही, किंवा बंद असल्यास पुन्हा सुरू करण्यासाठी नियोजन करावे. तालुक्यात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावे. पंचायत समिती व नगरपरीषदेत सेवा केंद्र महिला बचत गटामार्फत चालवावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी लोकसेवा हक्क आयुक्त् अभय यावलकर यांनी पवनी तालुक्यातील तहसिल कार्यालय, पवनी, भूमी अभिलेख कार्यालय पवनी, तालुका कृषी कार्यालय पवनी तसेच पंचायत समिती पवनी व नगरपरीषद पवनी या कार्यालयाची पाहणी केली व नागरीकाच्या तक्रारी ऐकुन घेतल्या.