Education
वैनगंगा विद्यालयाच्या किशोरी व कुंजल यांची राज्यस्तरीय निवड.
राज्यस्तरीय मॉडल मेकिंग कॉम्पिटिशन करिता अकोला येथे निवड
पवनी स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय किशोरी देवराव जीभकाटे व.कुंजल राजेश वंजारी यांची विज्ञान भारती तथा इसरो द्वारा आयोजित मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये आपलिकेशन आयडी २९८ मॉडेल एस्ट्रो सेट येथे यांची राज्यस्तरीय मॉडल मेकिंग कॉम्पिटिशन करिता अकोला येथे निवड झाल्याबद्दल वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर सचिव विनोद मेंढे संचालिका भावना तर्वेकर प्राचार्य पराग टेंभेकर उपमुख्याध्यापक अजय ठवरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे विज्ञान मंडळाचे सदस्य, सचिव भालचंद्र मोटघरे प्राध्यापक व मार्गदर्शक संदीप समर्थ यांचे यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले