Uncategorized

पवन विद्यालय, पवनी येथे राबविला स्वच्छता अभियान.

youtube
  1. पवन विद्यालय, पवनी येथे राबविला स्वच्छता अभियान.
    पवनी / पवन विद्यालय, पवनी येथे १७ सप्टेंबर ते २ऑव्टोबर गांधींच्या जयंती पर्यंत राबवित असलेल्या सप्ताह मध्ये पवनी शहरातील प्रमुख मार्गाने विद्यालयापासून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातामध्ये झाडू व खराटे घेऊन जिथे जिथे कचरा आहे तो डक्कल गाडीमध्ये टाकून वॉर्डातील कचरा उचलून सफाई करण्यात आली. स्वच्छता अभियानाचा संचालन बँड पथका द्वारे करून समाजाला जागृत करण्यात आले व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. लाकडी फलकावर स्वच्छतेच्या घोषणा लिहिण्यात आलेल्या होत्या. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये वर्ग 5 ते 10 चे विद्यार्थी व विद्यालयाचे मुख्याध्यापक चक्रधर मेश्राम, राजेश येलसट्टीवार, गजानन जाधव,कोमल धकाते,महेविश शेख,भुमेश्वरी तेलमासरे, यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमास सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close