एक दिवाळी अपना घरातील आई-बाबांसोबत साजरी
*एक दिवाळी अपना घरातील आई-बाबांसोबत साजरी*
✍️ प्रदीप घाडगे
*पवनी(भंडारा)* :- आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात आपली गुजराण करणाऱ्या वृद्धांना रुयाळ(सिंदपूरी) येथील अपना घर वृद्धाश्रमात गेल्या तीन वर्षापासून मायेची ऊब देण्यात येत आहे. वृद्धांचे आयुष्यात दिवाळीच्या निमित्याने नवीन पहाट उजेडावी यासाठी वृद्धाश्रमामध्ये वृद्धा समवेत सर्व कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन दिवाळी हा सण साजरा करतात .
पवनी येथील संस्थापक राजेश मेश्राम यांनी मागील तीन वर्षापासून मौजा रुयाळ( सिंदपुरी) येथे “अपना घर वृद्धाश्रम” ची सुरुवात केली सुरुवातीला हळूहळू वृद्धांची संख्या ही वाढत गेली .अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी अनेक आई-वडिलांना सेवा दिली, वृद्धांना अनेक सुख- सुविधा उपलब्ध करून दिल्या ,सुसज्ज खोल्या ,सुसज्ज स्वतंत्र बेड, फिरण्यासाठी योग्य तो वातावरण आणि २४ तास कर्मचारी कार्यरत असतात दररोज रक्तदाबाची तपासणी केली जाते .सकाळी सात वाजता चहा ,नऊ वाजता अल्पहार, दुपारी जेवण, सायंकाळी चार वाजता चहा आणि रात्री सात वाजता जेवण हा रोजच्या दिनचर्या आहे आणि मनोरंजनासाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम अनेक जयंत्या साजरा केल्या जातात.
दरवर्षी दिवाळी ही अनेक आनंद उत्साह हे आपल्यामध्ये घेऊन येत असते तोच आनंद वृद्धाश्रमातील आई-बाबांच्या द्विगुणित करण्यासाठी आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित अपना घर वृद्धाश्रम , सिंदपुरी येथे अमित हिरामण तुळसकर( गोवर्धन प्लाय सराफा लाईन पवनी )यांच्या परिकल्पनेतून आश्रमातील आई-बाबासोबत एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याची कल्पना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज साकार झाली .
अमित यांनी वृद्धाश्रमातील आई-बाबा करिता मिठाई , फराळ वाटपाचा कार्यक्रम तसेच अनेक दिवे लावून , ध्वनी न करणारे फटाके फोडून उत्तम प्रकारे दिवाळी साजरी करण्याचा क्षण वृद्धाश्रमातील आई-बाबांसाठी अवगत करून दिला.
सदर कार्यक्रमास अमित तुळसकर,खुशबू फुंडे,संघर्ष अवसरे, संस्थापक राजेश मेश्राम,यशवंत देशमुख,अनमोल नक्षिने इ. उपस्थित होते