-
- २९ ला विभागीय निवड चाचणी
भंडाराः सिनियर, ज्युनिअर, सब ज्युनिअर युथ गेम्स राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धे करिता गोवा येथे होणाऱ्या सिनियर युथ गेम्स राष्ट्रीय स्पर्धा मैदानी, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, चेस, रेसलिंग क्रिकेट व्हॉलीबॉल व विविध क्रीडा स्पधेसाठी विभागीय संघ निवड चाचणी २९ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ८ वाजता पासून जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी स्टेडियम भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणी मधून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले खेळाडू युथ गेम्स राष्ट्रीय स्पर्धा गोवा मपुषा येथे ६ ते ८ ऑक्टोंबर २०२४ करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १०,१२,१४,१६,१८ वर्षावरील सर्व खेळाडू भाग घेऊ शकतील स्पर्धेमध्ये ८०,१०० मी २०० मी., ३०० मी., ४०० मी. ८०० मी. १५०० मी. ५००० मी., १०००० मी. व उंच उडी, लांब उडी, भाला फेक, रिले अश्या विविध क्रीड़ा प्रकाराचा समावेश असुन स्पर्धा ८, १०, १२, १४, १६,१८, २०. पुरुष व महिला गटात घेण्यात येणार आहे .
खेळाडूंनी दिलेल्या वेळेवर, सोबत आधारकार्ड ची झेरॉक्स, स्पर्धा प्रवेश फी १०० रु. ( शंभर रुपये ) घेवून यावे. असे आयोजकांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी सुशिपाल सार्वे, सीमा आगासे, प्रविण पिंकलमुडे, सुनिल पंचबुधे, सुशांत बांडेबूचे, अमित मडावी यांच्याशी संपर्क साधावा . स्पर्धेमध्ये प्रवेश करताना आधार कार्ड, बोनाफाईड, जन्म तारखेचा दाखला आणि पासपोर्ट साईझ फोटो सोबत घेऊन यावे.
असे आवाहन युथ गेम्स भंडारा डिस्ट्रिक्ट असोसिएशन अ्ध्यक्ष गणेश ठवकर, विशाल टेंभुर्णी, अर्चना शर्मा, राकेश अतकरी, आश्विन सेलोकर, शंकार देलंकर, आशिका तुमसरे, निहाल इलमे, गोपाल मेश्राम, अमोल बोरघरे, तीर्थराज गाडवे, निखिल फोटफोडे यांनी केले आहे.