पवनी तालुकास्तरीय स्काऊट गाईड नोंदणी व माहिती वर्ग संपन्न .
प्राथमिक विभागातील ३४व माध्यमिक विभागात ३९ नोंदविला सहभाग.
-
पवनी / :भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात कब बुलबुल स्काऊट गाईड रोवर रेंजर यांच्या माहिती नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ ऑगस्टला विकास ज्युनिअर तथा विद्यालय पवनी व लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद अनुदानित विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या शाळांसाठी माहिती व नोंदणी वर्गाच्या आयोजन करण्यात आले होते जि . परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनी शासनाची माझी सुंदर शाळा या उपक्रमात स्काऊट गाईडचे महत्त्व लक्षात घेता . पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये माहिती आणि नोंदणी कार्यक्रम होत आहे. सकाळच्या सत्रात जवळपास 34 शिक्षक व शिक्षिका यांनी सहभाग घेतला तर दुपारच्या सत्रामध्ये 39माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला या माहिती वर्गामध्ये कब बुलबुल, स्काऊट गाईड, रोव्हर रेंजर यांची नोंदणी कशी करायची तसेच स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, तसेच रेल्वे व सरकारी नोकरीमध्ये मिळणारे लाभ या सर्व बाबीवर सखोल अशी माहिती देण्यात आली. तसेच शिक्षकांकरिता विविध पुरस्कार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणारे सामुदायिक विकास प्रकल्प, याची माहिती देण्यात आली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास विद्यालयाचे प्राचार्य गभने हे होते तर मार्गदर्शक म्हणून भंडारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊटचे देवेंद्र अरमळ ,जिल्हा संघटक(गाईड) रुपाली सूर्यवंशी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड रोहिणी रोकडे, यांनी मार्गदर्शन केले. लाखांदूर तालुकाप्रमुख विजय माटुरकर यांनी कृतीयुक्त गीत सादर केले .स्काऊट गाईडचे माजी राज्य मंडळ सदस्य तथा पवनी तालुका प्रमुख राजेश येलसट्टीवार, यांनी मार्गदर्शन केले .गाईड कॅप्टन सीमा गंडाते, स्काऊट मास्तर भोजराज दिघोरे प्रेमानंद हटवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे व सर्व प्रमुख मार्गदर्शक यांचे आभार मानले. तसेच जिल्हा कार्यालयाचे कर्मचारी सोनल खोत राजेश जयस्वाल यांनी कार्यालयीन जबाबदारी पार पाडली. स्काऊट मास्तर प्रदीप घाडगे विलास पाटील यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन व संचालन स्काऊट मास्तर प्रेमानंद हटवार यांनी केले.