Uncategorized

प्रणय आमझरेचे निट परिक्षेत घवघवीत यश.

youtube

 

आशिष सावंकार

बोरी अरब (चंद्र)प्रतिनिधी.. म्हणतात ना मंजिले उन्हि को मिलती है जिनके सपनो मे जान होती है! पंखो से कुछ नही होता मगर हस्ते से उडान हुआ करती है.
जिद्द, प्रयत्न, चिकाटी त्याचबरोबर त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेन्याची आवड असेल तर अश्या मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्याला यश कधीच हुलकावनी देत नाही. अशीच खूणगाठ बांधुन दारव्हा तालुक्यातील पाथ्रड (देवी) येथिल एका सामान्य भुमिहीन भोई समाजाच्या कुटुंबात जन्मलेल्या आई वडिलांचे छञ हरवलेल्या मुलाने नीट परिक्षेत प्रथम गुण घेऊन आपला डाॅक्टर होन्याचा मार्ग मोकळा केला आहे. प्रणय निळूनाथ आमझरे याने निट परिक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याला प्रथम गुण मिळाले. आणि शासकीय वैद्यकिय विद्यालय आणि रुग्नालय अकोला येथे एम बी बी एस ला निवड झाल्याबद्दल आपल्या पाथ्रड (देवी) गावाच्या ग्रामपंचायत मध्ये आज ३.०० वाजता सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेन्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयसिंगभाऊ राठोड होते. तसेच प्रमुख उपस्थिती माजी सरपंच राम पवार, सुभाष जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, अशोक मोरे उपस्थित होते. गजानन आमझरे, कोमल राठोड, पुंडलिक पवार, गजानन आडे, अनिल भगत, आकाश राठोड, गजानन राठोड,चेतन पवार (पत्रकार), उल्हास जांभोरे, रमेश आमझरे, क्रिश आडे, संकेत शहाडे, अमोल आमझरे, चरण पवार, रामहरी गुडदे, सत्वशिल आमझरे, आकाश आडे,हितेश पवार, धनराज गुडदे व गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री. सिध्दार्थ भगत यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री. किरण मोरे यांनी केले. एम बी बी एस ला प्रवेश मिळविणारा तो पाथ्रड देवी तील एकमेव पहिला विद्यार्थी आहे. हे विशेष निट या परिक्षेच्या अभ्यासाकरिता रेणुका कोचिंग क्लासेस नांदेड येथे गेला होता. अत्यंत तळमळीने, जिद्दीने, प्रामाणिकपणे अभ्यास केला. आई वडिल यांचा अपघातात मृत्यु झाल्यानंतरही खचुन न जाता चिकाटिने अभ्यास केला. कुटुंबातील काकांचे, आजोबांचे कष्टाळु जिवन जवळुन बघितल्यानंतर प्रणय ने घरची परिस्थिती बदलन्याकरिता डाॅक्टर व्हायचे स्वप्न उरी बाळगले. पहिल्याच प्रयत्नात नीट परिक्षा दिली. आणि त्यात त्याने प्रथम गुण प्राप्त केले. प्रणय ने जे यश संपादन केले. त्याचे श्रेय कुटुंब, शिक्षकवृंद आणि गावकर्‍यांना समर्पित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close