म .ज्योतिबा फुले बाल युवा मस्करी गणेश उत्सव
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे बहुमानाचे स्थान
¶वाकेश्वर ( जिल्हा भंडारा): महात्मा ज्योतिबा फुले बाल युवा मस्करी गणेश उत्सव मंडळ, वाकेश्वरच्या वतीने दि. 21 सप्टेंबर ला ” मस्करी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा ” च्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांना हा बहुमानाचा स्थान मंडळातर्फे देण्यात आला होता परंतु मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या मानाला मान देत नरेंद्र पहाडे यांनी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही याची खंत दाखवत आपल्या सहकारी सोबत्यांना कार्यक्रम स्थळी आवर्जून उपस्थिती¶ दर्शवायला सांगितली.
या ” मस्करी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा ” च्या कार्यक्रमाला नरेंद् नरेंद्र पहाडे यांची प्रतिनिधी निधी म्हणुन बालाभाऊ वाडीभस्मे, भाईजी मेहर, जयेश रामटेके उपस्थित होते.
मंडळातर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. भाईजी मेहर यांनी गावकरी बांधवांना संबोधित केले. गणरायाची आरती करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी लुहासजी गोंडाणे सरपंच वाकेश्वर, सुभाषजी आजबले, धनंजयजी तिरपुडे, प्राध्यापक गोंडाणे सर , गुरुदेवजी वैद्य,महेशजी आंबेकर, लोनेश्वरजी बोरकर, नाजुकजी भेदे सर्व ग्रामपंचायत सदस्यगण आणि बहुसंख्येने भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.