सामाजिक

आचलला न्याय मिळणार काय?*

youtube

**आचलला न्याय मिळणार काय?*
*आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप आचलच्या पित्याचा आरोप

रामटेक:रामटेक भोजापुर येथील एका विवाहित महिलेचा झालेला मृत्यू आत्महत्या नसून तिच्या सासरच्या मंडळीकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतक महिलेच्या पित्याने केला आहे. सदर मृतक महिलेचे नाव आचल विशाल आष्टनकर असून कौटुंबिक वादातून जीवननौका संपवण्याचा प्रकार झाल्याची तक्रार मृत्यूच्या पित्याकडून करण्यात आली. रामटेक पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक आचलचे लग्न भोजापूर येथील विशाल मनोहर आष्टनकर सोबत २ मे २०१९ ला जातीच्यारितीरिवाजाप्रमाणे झाले होते. संसारिक जीवन सुखरूप चालत असताना त्यांच्या आयुष्य वेलीवर मुलगा-मुलगी अशी दोन अपत्य जन्मास आलेत. दरम्यान पती विशाल हा पत्नी आचलला नेहमी मारझोड करायचा! तरीही संसार स्वर्ग समजून आचलने दिवस काढले. पुढे जीवनप्रवास करीत असताना आचलसाठी ७ जुलै २०२४ ची रात्र काळरात्र ठरली. या दिवशी आचलने १२ बाय १० च्या बेडरूममध्ये छताला असलेल्या सिलिंग फॅनला साडीच्या तुकड्‌याने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याचे लक्षात आले. सदर घटनेची माहिती रामटेक पोलिसांना व

मृतकच्या नातेवाईकांना देण्यात आली. लगेच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत घोषित केले व उत्तरीय तपासणीसाठी प्रेताला रुग्णालयात पाठविले
वस्तुस्थिती संशयास्पद !

मृतकचे पती विशाल आष्टणकर याने सांगितलेली वस्तुस्थिती संशयास्पद असून २३ इंच साडीच्या तुकड्याचा पंख्याला गळफास व पाय पलंगावर टेकलेले असताना जीव जाणार कसा? हा शोधाचा विषय आहे. मरताना कोणताही व्यक्ती जीव वाचविण्यासाठी धडपड करतो मात्र नौरोजीच्या बयानात हात सरळ, डोळे मिटलेले होते असे सांगितल्याने मृत्यूसमयी शरीराची कुठलीही हालचाल झाली नाही का असा प्रश्न देखील मृतकच्या वडिलांनी उठविला आहे?
भोजापुर / येथील घटना

मृतक आचलला न्याय मिळावा

मृतक आचलने सात जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असली तरी वडिलांनी केलेला हत्येचा आरोप कोणत्या स्तराला जातो यासाठी दोन महिन्यानंतर कुठलीही कारवाई नाही यावरूनपोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली आहेपंचनाम्यात आढळून आलेली वस्तुस्थिती शाशंक असताना पोस्टमार्टम रिपोर्ट दिशा देणारी ठरणार आहे. ही रिपोर्ट तात्काळ मागून अभ्यासाअंती पुढील कारवाई करून मृतक आचलला न्याय मिळवून देण्याची मागणी आचलच्या नातेवाईकांनी केली आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close