आरोपींचा शोध घ्या व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा: इंजि. सचिन सोनवाने
कोलकाता येथील हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्कार व हत्येचे प्रकरण
पुणे
दि. १८ आॅगस्ट
पश्चिम बंगाल ची राजधानी कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्कार नंतर हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरलं आहे.९ ऑगस्ट रोजी, एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पोस्ट-ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळला, मृतिका आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थी होती.आरोपींचा शोध घ्या व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा.” अशी मागणी श्री राम सेना सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष इंजि. सचिन सोनवाने यांनी केली आहे.”देश स्वातंत्र झालं म्हणून, आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण आपलं देश खऱ्या अर्थाने तेव्हा स्वातंत्र होईल, जेव्हा आपल्या देशातील नारी; या राक्षसी गुलामगिरीतून स्वातंत्र्य होईल.”*
*- इंजि. सचिन सोनवाने*
_(पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प)_