“”
पवनी :कोलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज मधील 31 वर्षीय डॉक्टर मोमिता बेबणार हिच्यावर झालेल्या विकृत लैंगिक अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल दुर्योधन वाघमारे यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्चची सुरुवात आज दिनांक १९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी चौक येथून सायंकाळी सहा वाजता होईल रक्षाबंधनाच्या पर्वावर युवा बांधवांकडून बहिणीची जबाबदारी घेत सुरक्षेची हमी देण्याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथे सुरक्षा शपथ कार्यक्रम आयोजित केला आहे तरी जनतेने सामाजिक बांधिलकी व कर्तव्याच्या परिषदेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पीडित बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी कॅण्डल मार्च मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन हर्षल वाघमारे यांनी केले आहे