समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी झटणारा क्लब म्हणजे फ्रेंड्स क्लब.: प्रेमसागर गणवीर
दोनशे पन्नास शिल्ड,व एकशे पन्नास फोटो सिंधुताई सपकाळ यांचे वाटप.
.
पवनी: स्थानिक फ्रेंड्स क्लब तर्फे आयोजित विद्यार्थी सत्कार सोहळा लक्ष्मी रमा सभागृह पवनी येथे पार पडला यामध्ये वर्ग दहावी, वर्ग बारावी ,व बीए फायनल बीएससी,
कॉमर्स, व स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन जे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेम सागर गणवीर सह उद्घाटक पूजा ठक्कर, माजी आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर लेपसे, विशेष अतिथी धनंजय तिरपुडे, तोमेश्वर पंचभाई, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पशुवैद्यकीय अधिकारी प स पवनी डॉ सचिन कुमार भोयर, नीट टॉपर यश सातपुते, आयआयटी गांधीनगर येथे शिकत असलेला फ्रेंड्स क्लब चा विद्यार्थी विनोद टेंभुर्णे, याच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये ७०% च्या वर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना अनाथाची माता सिंधुताई सपकाळ यांची प्रतिमा व शील्ड देण्यात आली. या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित झाले होते. फ्रेंड्स क्लबचे सहसचिव व नवनियुक्त मुख्याध्यापक देवचंद सावरबांधे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दुपारी एक वाजता सुरू झालेला कार्यक्रम सायंकाळी पाच वाजे पर्यंत सुरू राहीला.या मध्ये मान्यवर व्यक्तींची भाषणे व मार्गदर्शन, गुणवंतांचे अभिनंदन यामुळे कार्यक्रमाला बराच वेळ लागला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता फ्रेंड्स क्लब चे अध्यक्ष रोशन लांजेवार ,उपाध्यक्ष पराग देशमुख ,सचिव राजेश येलसट्टीवार, सहसचिव देवचंद सावरबांधे, कोषाध्यक्ष हर्षल वाघमारे, विवेक गायधने, दत्तु हटवार,रामा खापरीकर,
गुणेश गणवीर, दत्तु भाजीपाले,हितांशू टेंभुरकर ,सुजल उंदीरवाडेरोशन नागपुरे, निरज तलमले,प्रशिक गजभिये ऋतुजा पाटीलनेहा डोंगरे, नितीन, तसेच कामगार कल्याण मंडळ पवनी येथील शारदा पचारे, ईखार,यांनी सुध्दा कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले..