राजकिय

जनसन्मान यात्रे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक संपन्न

youtube

 

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्यावतीने राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा सुरु झालेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार प्रफुल पटेल या यात्रेच्या निमित्ताने सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ही यात्रा दिनांक १ सप्टेंबर २०२४ ला तुमसर शहरात दाखल होईल . त्यानंतर त्या यात्रेचे मातोश्री सभागृहामध्ये दुपारी १ वाजता सभेत रूपांतर होणार आहे.
या यात्रेच्या आणि सभेच्या जय्यत तयारी आणि नियोजनसाठी तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची अतीथी सभागृह तुमसर येथे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष धनेंद्र तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
दि. १ सप्टेंबर ला ठिक ११ वाजता खापा चौकात जनसन्मान यात्रेचे आगमन होणार आहे. याप्रसंगी त्यांचे, जंगी स्वागत, रॅलीचे आणि तुमसर शहरातील ठीक ठिकाणी लागणाऱ्या बॅनर आणि नंतर होणाऱ्या सभेचे योग्य नियोजन यावर प्रमुख अतिथी व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी चर्चा करण्यात आली. आणि ही यात्रा भव्य दिव्य करण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारी स्विकारावी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीला विधानसभा प्रमुख देवचंद ठाकरे, माजी नगराधक्ष अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, सुनील थोटे, जिल्हा परिषद सदस्य राजू ढबाले, पमाताई ठाकूर, याशिन छवारे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगणजुडे, निशिकांत पेठे, मनोज वासनिक, मनोज झुरमुरे, राहुल भवसागर, सलाम तूरक, तोशल बुरडे, अजय बिसने, देवेंद्र शहारे, उमेश तूरकर, सचिन बवनकर, सरोज भुरे, माणिकराव ठाकरे, शालिक गौपाले, तेजराम ठाकरे, नंदा डोरले, कविता साखरवाडे, सचिन भोयर, खेमराज गभने, लखन मोरे, अजय भुसारी, कपिल जैन, सुधीर पुंडे, राजेंद्र बघेले , शलिनी पेठे, वंदना चकोले, भूपेंद्र नागफासे, पारस भुसारी, अमित टेकाम, पूनम पाठक, कलाम शेख, सुनिल पटले, संजय रहांगडाले, संदीप डहाट, नामदेव हटवार, सुकलाल सिंदपुरे, मीना गाढवे, राहुल वासनिक, विजया चोपकर, दिलीप सोनवाने, गोल्डी घडले, चंदू बन्सोड, गोलू गौतम, सुरेश गोखले, पुरणलाल टेकाम, ओमेश्वर वासनिक, सुनील रहांगडाले, रंजना तूरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close