जिल्हा उपाध्यक्ष उमराव सेलोकर, तालुका महामंत्रीपदी गौरीशंकर पालांदुरकर यांची निवड
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- भारतीय जनता पार्टी अंतर्गत येणाऱ्या ओबीसी मोर्चा भंडारा च्यावतीने भंडारा तालुक्यातील बेला येथील उमराव सेलोकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर मोहाडी तालुक्यातील नेरी येथील रहिवासी गौरीशंकर पालांदुरकर यांची तालुका महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी उमराव सेलोकर, गौरीशंकर पालांदुरकर, महादेव दास, रामु सेलोकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार सुनिल मेंढे, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, प्रदीप पडोळे, भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, महामंत्री महेश पटले, लोकसभा प्रभारी महेंद्र निंबार्ते, उपाध्यक्ष मनोज बोरकर, अनुप ढोके व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी येथे प्रवेश केला होता.
त्यांच्यातील कौशल्य व आत्मविश्वास पाहुन भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी यांनी ही नियुक्ती केली आहे.
त्याबद्दल महामंत्री महेश पटले, लोकसभा प्रभारी महेंद्र निंबार्ते, उपाध्यक्ष मनोज बोरकर, भंडारा तालुकाध्यक्ष निलकंठ कायते, युवा संघटक यश ठाकरे, उपाध्यक्ष रवींद्र खंडाळकर, महादेव दास, रामु सेलोकर, सुर्यकांत इलमे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
उमराव सेलोकर जिल्हा उपाध्यक्षपदी व गौरीशंकर पालांदुरकर तालुका महामंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांनी फटाके व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा केला आहे.
अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी हे सदैव कार्यरत आहेत. म्हणून त्या अनुषंगाने ओबीसी मोर्चाचे संघटन वाढावे व पक्ष बठकटीसाठी तसेच मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. आणि त्यांच्याकडे असलेली जबाबदारी परिपूर्ण पाडण्यासाठी सदैव अग्रेसर राहणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.