शैक्षणिक
पा. वा. शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा
श्रीकृष्णाच्या वेशभूषेत चिराग धकाते ने दहीहंडी फोडली
विलास केजरकर भंडारा.
- भडारा:- नविन मुलींची शाळा संस्था भंडारा व्दारा संचालित पार्वतीबाई वाठोडकर नविन मुलींची उच्च प्राथमिक शाळा भंडारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नविन मुलींची शाळा संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम. एल. भुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव शेखर बोरसे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका करूणा इन्कने, विणा कुर्वे, मुख्याध्यापिका सुनिता हुकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यवेळी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी श्रीकृष्ण व राधा यांचा वेषभुषा परिधान केला होता. गायत्री येल्लजवार व माही अरखेल यांनी यशोमती मैय्या बोले नंदलाला, याक्षणी भजन सादर केला. आणि छवी व वीग व त्रीशा वीग यांनी राधा कैसे ना जले या गितावर नृत्य सादर केले होते. श्रीकृष्णाच्या वेशभूषात असणाऱ्या चिराग धकाते ने दहीहंडी फोडली होती. तसेच उपस्थित मान्यवरांनी श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथूरेत कंसाच्या बंधिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. तसेच श्रीकृष्ण व राधा यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यो. म. काटेखाये व प्रास्ताविक प्रा. वा. नविन मुलींची शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता( हुकरे) पटोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार व. ग. खोकले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शा. ई. नाकाडे, रा. रा. करनाहके, रा. ध. राहांगडाले, मंगला साटोणे, अं. शि. राऊत, प्रेमलाल मलेवार, रंजित खंगार, विलास खोब्रागडे, सेजल नंदनवार, कनक नंदुरकर, चिराग धकाते, आदिती नंदुरकर विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.