भंडारा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन
भंडारा:- जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा, जिल्हा क्रीडा परिषद व एकवीध क्रीडा संघटना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट २०२४ ला सकाळी ७ वाजता राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले आहे.
त्याकरिता गांधी चौक भंडारा येथे सकाळी ७ वाजता खेळाडूंची रॅली, पोष्ट ऑफिस मार्गे जिल्हा क्रीडा संकुल पर्यंत निघणार आहे. आणि जिल्हा क्रीडा संकुल येथे गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, एकवीध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, तलवार बाजी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल कुरंजेकर, व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.