शैक्षणिक
विनोबा पोस्ट ऑफ मंथ पुरस्काराने विशाल बोरकर सन्मानित*
तालुकास्तरीय ग्रंथ महोत्सवात झाला सन्मान
*
*पवनी*दि.३०
जुलै महिन्यासाठी कोदुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथील शिक्षक विशाल बोरकर यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. शुक्रवार दिनांक ३० रोजी नगरपरिषद विद्यालय पवनी येथे तालुकास्तरीय ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गटविकास अधिकारी दीपक गरुड यांच्या हस्ते प्रमाणपत्र ,शैक्षणिक साहित्य संच देऊन यांचा गौरव करण्यात आला.जिल्हा परिषद शाळा अंतर्गत शिक्षकांसाठी विनोबा ऍप हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून शिक्षक विविध नवीन उपक्रम राबवितात. उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांची पोस्ट ऑफ मंथ पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कुमार वासनिक त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक निखिल गजभिये उपस्थित होते.