शेष नगर गणेश मंडळातर्फे मूर्तीची स्थापना
शेष नगर गणेश मंडळातर्फे मूर्तीची स्थापना.
पवनी:-दि.७/
स्थानिक शेष नगर गणेश उत्सव मंडळातर्फे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून श्री च्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.सदर उत्सव दहा दिवस चालणार असून यामध्ये वृक्षारोपण,विद्यार्थी हिताचे शैक्षणिक उपक्रम, समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.सर्वप्रथम राष्ट्रीय महामार्गाने श्रीच्या मूर्तीचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून “गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली.महिला मंडळी यांनी विधीवत पूजा अर्चा करून आरतीने एका तालासुरात गायन केले.त्यानंतर चेतन जिभकाटे यांच्यातर्फे सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता मंडळाचे अध्यक्ष निलेश पारधी,उपाध्यक्ष प्रदीप घाडगे,सचिव बंटी जिभकाटे,अशोक गिरी, दिनेश कापगते,विशाल बोरकर,रमेश खोपे, सुनील तिघरे,तथा समस्त सदस्य मंडळी व शेष नगर वासी यांनी सहकार्य केले.