सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत महावाचन उपक्रम.
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात
दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत महावाचन उपक्रम.
पवनी:-दि.२८/
सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत शालेय परिपाठ आटोपताच शालेय विद्यार्थ्यांची स्मार्ट पी.टी.घेण्यातआली.
त्यानंतर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महावाचन उपक्रम अंतर्गत शाळेमध्ये ग्रंथालयातील उपलब्ध वाचनीय विविध पुस्तकांचे वाचन व लेखन शालेय विद्यार्थ्यांनी केले.तसेच पुस्तके वाचून अभिव्यक्त केलेले फोटो तथा व्हिडिओ राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली.तसेच आनंददायी शनिवार अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी एक पेड माता के नाम या उपक्रमाअंतर्गत घरुन आणलेल्या रोपांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते कुंडी मध्ये रोपन करण्यात आले.अशाप्रकारे विद्यार्थी मनाला आनंद देणारा आजचा आनंददायी शनिवार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या मार्गदर्शनात उपक्रमशील शिक्षक अशोक गिरी, सिद्धेश्वर फड,नीता मोटघरे,हर्षा तलवारे, अरुणा कांबळे,भावना निमजे,चित्रा धकाते,मयुरी मानापुरे,प्रणय धुरई, भारती बोरकर तथा शालेय विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.