प्रा. प्रेमचंद्र श्रावण सुर्यवंशी* *यांना **प्रथम स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन*
¶¶. *प्रा. प्रेमचंद्र श्रावण सुर्यवंशी* *यांना **प्रथम स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन*
पवनी;जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साप्ताहिक *चौरासचा साक्षी* व *पवनी टाॅकीज* चे संपादक निवृत्त प्रा. प्रेमचंद्र श्रावण सुर्यवंशी यांचे सोमवार दिनांक १८/०९/२०२३ ला नागपूर येथे हृदयाच्या तीव्र आघाताने निधन झाले होते . त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सूर्यवंशी परिवार व न्यूज 24 मराठीआप्त मित्र परिवारातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले
प्रा. प्रेमचंद्र श्रावण सुर्यवंशी यांचा अनेक शैक्षणिक,धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच असायचा. आंबेडकरी चळवळीत योगदान असलेले प्रा. प्रेमचंद्र सुर्यवंशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) भंडारा जिल्ह्य़ाचे उपाध्यक्षही होते. चंद्रमणी बुध्द विहार पवनीचे ते उपाध्यक्ष होते. दलित मानवाधिकार राष्ट्रीय अभियान, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया अश्या अनेक सामाजिक संस्थामध्ये ते सक्रिय होते.
त्यांनी प्राध्यापक म्हणून पी.एस.एस कालेज पवनी येथे १९८३पासून सुरुवात केली होती. पुढे त्यांनी प्राध्यापक म्हणून शशिकांत दैठणकर कनिष्ठ महाविद्यालय बारव्हा, गजाननराव रंभाड महाविद्यालय, देव्हाडा ( तुमसर) येथे आपली सेवा बजावली. ते लोकमान्य टिळक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथून सेवानिवृत्त झाले.
ते अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, सहकार, आंबेडकर थॉट्स, बुध्द थॉट्स या विषयांमध्ये एम.ए. तसेच एम.काॅम, एम.एड इत्यादी पदव्या संपादित केल्या होत्या. दलित व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी पवनीत आपल्याच राहत्या घरी त्यांनी “ स्मृतिशेष रखूबाई सुर्यवंशी मागासवर्गीय वाचनालय व ग्रंथालय ” स्थापन केले. अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना त्यांनी जोपासला होता. नेहमीच शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना ते सढळ हाताने आथिर्क मदत करत असत.
पत्रकारितेत त्यांनी १९८० च्या दशकात दैनिक लोकमत मध्ये वार्ताहार म्हणून सुरुवात केली. पुढे १९९९ मध्ये त्यांनी स्वतःच्या साप्ताहिक चौरासचा साक्षीची सुरुवात केली. नुकतेच त्यांनी पवनी टॉकीज या वेब पोर्टल चीही सुरूवात केली होती.
पवनी च्या इतिहासाबाबत ते तज्ञ होते. बुद्धकालीन पवनीचा इतिहास व आंबेडकरी इतिहास माहिती करण्यासाठी अनेक इतिहासंशोधक त्यांच्याशी संपर्क साधत. डॉ वा.ना. मेश्राम यांच्या बुध्दीस्ट पवनी या प्रसिद्ध पुस्तकाचे ते प्रकाशकनही त्यांनीच केले होते. पवनीतील बुध्दकालीन स्तूपांच्या संवर्धनाबाबत ते प्रयत्नरत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचे जतन त्यानी आपल्याकडे करून ठेवले होते ज्या आजही त्यांच्या परिवाराकडे सुरक्षित आहेत. पवनी येथे भगवान बुध्दांच्या 40 फुटांची भव्य मूर्ती उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. निधनापूर्वी ते पवनीचा इतिहास या पुस्तकावर लेखनकार्य करत होते.. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेम फाउंडेशन उभारून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा मानस त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला
याप्रसंगी पत्नी डाॅ. उषाकीरण, दोन मुले डाॅ. क्षितिज व डाॅ. सागर, तीन भाऊ वसंता सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, प्रा यादव सूर्यवंशी, दोन बहिणी व बराच मित्र व आप्त परिवार यांनी स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली.