राज्यपाल महोदयांच्या दौ-यासाठी अवजड वाहनांची वाहतूक वळती∈
राज्यपाल महोदयांच्या दौ-यासाठी
अवजड वाहनांची वाहतूक वळती∈
भंडारा,दि.29 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उदया दि.30 सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौज्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून व वाहतुकीची कोंडी निर्भाग होण्यासाठी सदर दौऱ्यादरम्यान वाहतुक सुरळीत राहावी व कायदा व सुव्यवस्था कायम राहावे याकरिता वाहतुकीचे नियमन व नियोजन करणे आवश्यक असल्याने
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.संजय कोलते, यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर मार्गाने येणारी जड-अवजड वाहतुक वळविण्याचे आदेश केले आहेत.
त्यानुसार नागपूर कडून तिरोडा-गोंदिया कडे जाणारे जड अवजड वाहतुक नागपूर रामटेक-कांद्री-जांब-खापा-देव्हाडा- तेथुन पुढे तिरोडा- गोंदिया मागे पुढे जातील. गोंदिया तिरोडा अदानी प्लॅट, तुमसर कडून भंडारा नागपुर कडे जाणारी जड अवजड वाहतूक खापा चौकातून जांब- कांद्री रामटेक मार्गे नागपुर कडे. साकोली, लाखनी कडून भंडारा नागपुर कडे जाणारी जड अवजड वाहतुक लाखनी- केसलवाडा अडयाळ – पवनी मार्ग-भिवापुर-उमरेड-नागपुर कडे. नागपुर कडून देवरी कडे जाणारी जड अवजड वाहतुक नागपुर शहापुर सातोना वरठी- मोहाडी- तुमसर- गोंदिया मार्ग सुरू राहतील.
तसेच अधिसूचना दिनांक 30 सप्टेंबर,2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपावेतो अंमलात राहील.सदर अधिसूचना माझे सही व शिक्यानिशी आज दिनांक 29 सप्टेंबर,2024 रोजी निर्गमित करण्यात येत आहे.असे डॉ.संजय कोलते जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.
0000000