सामाजिक

प्राचीने, अंध विद्यार्थ्यांच्या हातावर बांधली, प्रेम, विश्वास आणि अतूट बंधनाची डोर*

youtube

*प्राचीने, अंध विद्यार्थ्यांच्या हातावर बांधली, प्रेम, विश्वास आणि अतूट बंधनाची डोर*

भंडारा :- गांधी विचार मंच, संस्कार चळवळ व समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
गांधी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वामन तुरिले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय अंध विद्यालयाचे अधिक्षक एस.एन.बारई, संस्कार चळवळचे सक्रिय कार्यकर्ते विलास केजरकर, नँशनल खेळाडू प्राची चटप, प्रकाश बागडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य समीर नवाज उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी गांधी विचार मंच व संस्कार चळवळीचे महत्व आणि शासकिय अंध विद्यालयाचे अतुट संबंध या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राची चटप ने अंध विद्यार्थ्यांच्या हातावर विश्वास आणि अतूट बंधनाची डोर भावाच्या हातावर प्रेमाचे बंधन असलेली राखी बांधली. बहिणीचे प्रेम पाहून बावनथडे यांने बंधुत्वाचे कर्तव्य, प्रत्येक पाऊलावर बहिणीच्या पाठीशी भाऊ कसा उभा राहतो. त्याबद्दल गीत सादर केले. प्रेमाचा बंधन “रक्षासूत्र” बांधण्यासाठी प्राचीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून आरती करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
रक्षाबंधन कार्यक्रमा दरम्यान यशवंत सावरबांधे, विठ्ठल हटवार, अर्थव वानखेडे, धुर्व्र बारस्कर, अभय गहाणे, आकाश गेडाम, रविशंकर वाघाडे, अविनाश डोंगरवार, पियुष ठाकरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी बहिणीची उणीव न भासू देता प्राची ने त्यांच्यासोबत छान गोष्टी सांगत त्यांचे मने जिंकले होते. तर सर्वांचे डोळे पाणावले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रेश्मा डेकाटे, दुर्गा चटप, रामा क्षिरसागर, प्रदीप काटेखाये, राहुल मेश्राम, आलिशा नंदनवार इत्यादींनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close