देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार – २०६ कोबरा बटालियन: एसी जितेंद्रकुमार यादव*
जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्राची चटप ने बांधल्या कोबरा बटालियन सैनिकांना राख्या*
भंडारा : आम्ही सैन्यात दाखल झालो. तेव्हापासून देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित असतो. यादरम्यान कुठलाही सण उत्सव कुटुंबियांसोबत साजरा करण्याचे भाग्य नाही. भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन वारा पाऊस तसेच हिमवर्षाव यांची तम्मा न बाळगता जनतेचे संरक्षण करण्यासाठी सदैव तैनात असलेल्या आम्हा सैनिकांना “धागा शौर्य का राखी अभिमान की” या उपक्रमातंर्गत गेल्या नऊ वषार्पासून विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वतः राख्या तयार करत पत्ररूपी संदेश व राख्या पाठविण्याचा अभिनव उपक्रम सामाजिक कार्यकर्ते तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर यांच्या संकल्पनेतून पंजाब, जम्मू काश्मीर व आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली तसेच २०६ कोबरा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्यामुळे आमच्या सैनिकांचा मनोबल, आत्मविश्वास वाढविला आहे. त्यांच्याकरिता देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे प्रतिपादन २०६ कोबरा बटालियनचे व्दितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यादव यांनी केले.
ते भारतीय सैनिक कोबरा बटालियन २०६ चितापुर येथे रक्षाबंधना निमित्ताने राखी व संदेशरूपी पत्राला उत्तर देतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी २०६ कोबरा बटालियनचे एसी जितेंद्र कुमार यादव होते. त्यावेळी इंन्सिपेक्टर आनंद विश्वकर्मा, संस्कार चळवळचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, राहुल मेश्राम, जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा नँशनल खेळाडू प्राची चटप उपस्थित होते.
यावेळी जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा नँशनल खेळाडू प्राची चटप हिने सैनिकांना राखी बांधून औक्षवंत केले.
रक्षाबंधन प्रसंगी जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला अध्यापक विद्यालय व महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालयातील अनेक विद्याथीनींनी सैनिकांना लिहलेल्या संदेशपत्राचे वाचन एसी जितेंद्र कुमार यादव यांनी केले. त्यावेळी राखी बांधत व संदेश वाचन करतांना अनेक सैनिकांचे डोळे पाणावले होते.
“धागा शौर्य का, राखी अभिमान की” या उपक्रमाअंतर्गत गेल्या नऊ वर्षापासुन जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला अध्यापक विद्यालय व महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालयातील अनेक विद्याथीनींनी स्वतः राख्या तयार करत पत्र रूपी संदेश पाठविण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते केजरकर यांच्या संकल्पनेतून राबवित २०६ कोबरा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्व संधीला कोबरा बटालियन २०६ चितापुर येथे निमित्ताने चार विद्यालयातील विद्याथीनींनी स्वत: राखी व संदेश पत्र तयार केलेला बॉक्स इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, राहुल मेश्राम, जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा नँशनल खेळाडू प्राची चटप यांनी २०६ कोबरा बटालियनचे कमांडंट व्दितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यादव, आनंद विश्वकर्मा, दिनकर व प्रविण कुमार यांना सुपुर्द केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, वैशाली धारस्कर, धनराज बारस्कर, वर्षा चांदेकर, समीर नवाज, प्रदीप काटेखाये, दुर्गा चटप, प्रा. विजया कन्नाके तसेच भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, महिला अध्यापक महाविद्यालय, जिजामाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थीनींनी व शिक्षकेत्तर कर्मचारी, कोबरा बटालियनच्या अधिकारी, कर्मचारी तसेच सैनिकांनी सहकार्य केले.