ग्रीन पार्क’ सावरी येथे वृक्षारोपण व वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम यशस्वी*.
ग्रीन पार्क फलकाचे अनावरण
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- लाखनी तालुक्यातील सावरी येथील तलावावर शिवमंदिर नागठाण देवस्थान लागून असलेल्या जागेत तसेच सावरी स्मशानभूमीत ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीने सावरी ग्रामपंचायत तसेच शिवमंदिर नागठाण देवस्थान संबंधित युवक मंडळींना हाताशी धरून मागील सहा वर्षात अनेकदा वृक्षारोपण केले. या दोन्ही ठिकाणी भरपूर झाडें मोठी झाली असून त्याठिकाणी आता लावलेल्या वृक्षांची डेरेदार सावली तसेच शिवमंदिर नागठाणा परिसरात हिरवा विसावा गार्डन तयार झालेला आहे. सकाळ सायंकाळी आबालावृद्ध, महिला व तरुण मंडळी दररोजचे काही क्षण त्याठिकाणी घालवीत असतात. सावरी तलावावरील गार्डनला आता ‘ग्रीन पार्क’ असे संबोधिले जात आहे.
या ‘ग्रीन पार्क’चा अधिक विस्तार व्हावा याकरिता ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व सावरी ग्रामपंचायत कमेटी त्याचबरोबर शिवमंदिर नागठाण देवस्थान तर्फे ‘ग्रीन पार्क’ फलकाचे अनावरण केंद्रीय राखीव पोलीस दलातून (सीआरपीएफ) नुकतेच दोन दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेले कॉन्स्टेबल चितेश मने यांचे हस्ते सावरी तलावावर करण्यात आले. यावेळी सावरी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन बागडे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री मोहन रेहपाडे, आदित्य बागडे, भोजराज मांढरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष उदाराम धांडे, शिक्षक डुलेश धांडे, नागठाण देवस्थानचे भारत मेश्राम, दिनेश नान्हे, प्रवीण धांडे, शशिकांत गायधनी, कार्तिक धांडे, माजी सरपंच शारदा नागलवाडे, शालू बोपचे, सुभाष मोहनकर, राजू चाचेरे,मुरली नान्हे त्याचबरोबर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष अशोक वैद्य, कार्यवाह प्रा. अशोक गायधने, पदाधिकारी अशोक नंदेश्वर हे उपस्थित होते.
यानंतर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे ‘लाखनी निसर्गमहोत्सवाअंतर्गत तयार करण्यात आलेले अनेक वृक्षरोपांचे वृक्षारोपण ‘ग्रीन पार्क’ व सावरी स्मशानभूमीत करण्यात आले वृक्षारोपण करण्यात आले.
याचवेळी इकोफ्रेंडली रक्षाबंधनाचे औचित्य साधून ग्रीनफ्रेंड्स तर्फे वृक्षराख्या ‘ग्रीन पार्क’ वरील मोठे झाडांना तसेच सावरी स्मशानभूमीतील झाडांना बांधण्यात आले. सर्वांनी ‘वृक्ष माझा सखा- मी त्याचा रक्षणकर्ता’ असा उदघोष केला. श्रावण महिन्यातील रक्षाबंधनाच्या पर्वावर शिवमंदिर पूजेचे आयोजन ग्रीन पार्कवर केले गेले. यावेळी महाप्रसादाचे वाटप उपस्थित भाविकांना व कार्यकर्त्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाला संबोधित करतांना सरपंच सचिन बागडे यांनी सावरी येथील ‘ग्रीन पार्क’ अधिक विकसित व आकर्षित करण्यासाठी शासकीय स्तरावरून अधिक प्रयत्न व अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी अधिकाधिक देणगी देऊन ग्रीन पार्कला विकसित करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी ग्रीनफ्रेंड्स तर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी तर आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रीनफ्रेंड्सचे अशोक नंदेश्वर, आराध्या आगलावे, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, गोपाल बोरकर, अशोक हलमारे डॉ. मनोज आगलावे, नाना वाघाये, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, अशोका बिल्डकॉन पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर, निर्वाण हार्डवेअर्सचे हुपेंद्र बाळू निर्वाण, महाराष्ट्र प्लास्टिक सेंटरचे मालक अनिल बावनकुळे, निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, सलाम बेग, मयूर गायधने, दर्वेश दिघोरे, नितीन निर्वाण, धनंजय कापगते त्याचबरोबर नेफडो जिल्हा शाखा भंडारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा गोंदिया जिल्हा पर्यावरण शाखा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा तालुका शाखा लाखनी, लाखनी नगरपंचायत पर्यावरण व स्वच्छता विभाग इत्यादी संस्थाचे अनमोल सहकार्य लाभले.