आयुर्वेदिक दवाखाना राजेगाव येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न*
विलास केजरकर भंडारा
भंडारा :- तालुक्यातील राजेगाव येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात (आयुष) ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नुकताच घेण्यात आला.
आरोग्य शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नवीन डेकाटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, सालेभाटा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत कौरती, राजेगाव आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कमाने, राजेगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सोनटक्के, लाखोरी आयुष वैद्यकीय अधिकारी लाखोरी डॉ. पितांबर तलमले योगा प्रशिक्षक रीता निर्वाण उपस्थित होते.
त्यावेळी योग शिबिर घेण्यात आले. सर्व उपस्थित नागरिकांना आयुर्वेद व त्याचे फायदे या विषयावर माहिती देण्यात आली. जेष्ठ नागरिकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच अतिथींच्या हस्ते आयुष्मान आरोग्य मंदिर परिसरामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करून आरोग्य तपासणी मध्ये व्याधीग्रस्त नागरिकांना आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, वातविकार संधी विकार, नेत्र विकार, रक्तालपता अशा प्रकारचे चिकित्सा उपक्रम राबवण्यात आले.
शिबिरामध्ये १३० च्यावर लाभार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नवीन डेकाटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.भास्कर खेडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष अधिकारी राजेगाव डॉ. अर्चना सोनटक्के, आयुष अधिकारी लाखोरी डॉ. पितांबर तलमले, समुदाय आरोग्य अधिकारी राजेगाव डॉ.शितल रामटेके, समुदाय आरोग्य अधिकारी सोमलवाडा डॉ. सुचिता शेंडे, समुदाय आरोग्य अधिकारी नेहा सुर्यवंशी तसेच आरोग्य सेविका प्रीती हटवार, आरोग्य सेविका माधुरी लिमजे, कांचन चेटुले, आरोग्य सेविका हेमलता हरिणखेडे, आरोग्य सेविका लता खेडीकर, आरोग्य सेवक गुलाब कावळे, नेत्र तपासणी ओपथालमिक अधिकारी नादिरा मेश्राम व सर्व आशा वर्कर उपकेंद्र राजेगाव तसेच परिचर संगीता, गीता, अनिता, नलु इत्यादींनी सहकार्य केले.