पथविक्रेता समिती सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध
मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार
विलास केजरकर भंडारा
भंडारा:- येथील नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पथ विक्रेता समिती सदस्य पदाची निवडणुकीत सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडणुकीत सर्वसाधारण खुला गटातून जयराम शिवराम ठोसरे, दयाल शामराव चौबे, सर्वसाधारण (महिला राखीव) उषा अशोक पंडेल, अनुसूचित जाती (महिला राखीव) गटातून दुर्गा रवींद्रप्रसाद लोले, अनुसूचित जमाती गटातून मनोज रामलाल वलके, इतर मागासवर्ग (महिला राखीव) गटातून अनिता रवी क्षिरसागर, अल्पसंख्याक गटातून अख्तर बेग मिर्झा अलीयार बेग मिर्झा व विकलांग/दिव्यांग गटातून शंकर महादेव बावनकुळे यांची बिनविरोध निवडून आले आहेत. नगर परिषद भंडारा, नगर पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पे(उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१६ अन्वये नगर परिषद क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे विनियमन व नियंत्रण करण्याकरिता एकूण २० सदस्यांची नगर पथ विक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे.यामध्ये शासकीय विभागातील ५ व इतर अशासकीय संघटना संघ मधून ७ त्याच बरोबर पथ विक्रेत्यांचे ८ सदस्य असतील. हे पथ विक्रेत्यांचे ८ सदस्य नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे घेण्याचे अधिनियम २०१४ मध्ये नमूद आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद अंतर्गत २ ऑगस्ट २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात १२ ते १३ ऑगष्ट पर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले. यामध्ये सदस्य पदासाठी ८ अर्ज प्राप्त झाले. प्रवर्गनिहाय ८ अर्ज प्राप्त झाल्याने सर्वच आठही सदस्यांची २२ ऑगष्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांनी आठही सदस्यांना विजयी घोषित करीत सदस्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहा. नगर रचनाकार मुकेश कापसे, निवडणूक नोडल अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी गणेश मुळे व शहर अभियान व्यवस्थापक प्रवीण पडोळे, प्रकाश बांते व समूह संघटक उषा लांजेवार, रेखा आगलावे व नगर परिषद चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.