सैनिकांप्रति भावनिक कृतज्ञता व्यक्त केल्या महिला अध्यापक विद्यालयाच्या छात्रध्यापक विद्यार्थिनींनी
महिला अध्यापक महाविद्यालयात धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रमांतर्गत
सैनिकांप्रति भावनिक कृतज्ञता व्यक्त केल्या महिला अध्यापक विद्यालयाच्या छात्रध्यापक विद्यार्थिनींनी
भंडारा:- देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. विविधतेत एकता नटलेली आढळते. बहीण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण होय. आपल्या देशातील सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या रक्षणाकरीता सण असो की नसो आपले कार्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यामुळे आपण सुखाने जीवन जगत आहोत. आपल्यासाठी ते अहोरात्र ऊन, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता मेहनत करीत आहे. तर आपले देखील कर्तव्य बनते की त्यांच्यासाठी काही तरी करावे.
आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्याने देशाच्या रक्षणकर्त्याला राखी व संदेश पाठवून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यापक महाविद्यालयात धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रमांतर्गत छात्रध्यापक विद्यार्थिनींनी राखी बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन राख्या बनविल्या व देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति भावनिक कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश लिहिले आहे. या करीता विद्यार्थिनी सक्रिय सहभाग दर्शविला. महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली धारस्कर यांनी पत्रकार तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर यांच्याकडे राख्या व संदेशरूपी पत्र सुपूर्त केले आहे.
या कार्यक्रमाला भार्गवी भोंगाडे, जान्हवी झाडे, लावण्या हरडे,मृणाली चव्हाण, केतकी मानापूरे, दिया हुमणे, वेदांक्षी पिल्लेवान, श्रावणी गोंडाणे, अथर्व कछवाह, यश देव्हारे, शांतनू रोटके, आरूष हटवार, शशांक ईश्वरकर, यथार्थ मदनकर, श्रितिज गजभिये तसेच महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील हरित सेना व स्काऊट व गाईड च्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले.