किनगाव जट्टू येथे बैलपोळा उत्साहात साजरा
- किनगाव जट्टू येथे बैलपोळा उत्साहात साजरा..
केशव सातपुते लोणार(जिल्हा बुलढाणा)
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू मध्ये दिनांक 2 सप्टेंबर रोजी पोळा साजरा करण्यात आला दर वर्षी श्रावण अमावस्येला सर्वत्र बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात या अनुषंगाने किनगाव जटूटू येथे सुध्दा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेषत: ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो जे बैल जोडी बारा महिने उन्हात पावसात शेतकऱ्यांसोबत कष्ट करतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शेतकरी खादमळणीच्या दिवशी आपल्या सर्जा राजाच्या जोडीला स्वच्छ धुतात व संध्याकाळी त्यांच्यी पुजा करतात व आज आमंत्रण उद्या जेवायला या असं बैलांच्या कानात सांगतात पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगाला बेगड लावतात तर गळ्यात घुंगरांच्या माळा बांधतात पायात पैंजण बांधतात पाठीवर झुला टाकून त्यांचा शृंगार करून बैलांना ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावचे ग्राम दैवत हनुमान मंदिरासमोर एकत्र जमवतात या वेळेस लहान बालका व मोठ्या मानसं पोळा पाहण्यासाठी गर्दी करतात तर येथील मानकरी माधवराव बिन्नीवाले यांच्या हस्ते बैलांची पूजा करून बैल पोळा फोडल्या जातो व नंतर सर्व शेतकरी वाजत गाजत बैल आपल्या घरी घेऊन जातात व नंतर आपल्या घरी सपत्नीक पूजा करून शेतकरी आपल्या सर्जा राजांच्या जोडीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतो व नंतर गावातील घरोघरी नेऊन माता भगिनी बैलांना ओवाळून पुरणपोळी खायला देतात अशा प्रकारे येथील युवा शेतकरी विजय राऊत ज्ञानेश्वर सातपुते शिवाजी वाघमारे माधव सातपुते शंकर सोनुने शरद राऊत ज्ञानेश्वर सांगळे आकाश सातपुते यांनी मागील पाच वर्षापासून कोणत्याही प्रकारचा वाद न होऊ देता वाजत गाजत बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे