लाईव्ह न्यूज 24 मराठी नेटवर्क सावरला (जिल्हा भंडारा): पवनी तालुक्यातील चंद्रपुर व भंडारा जिल्हा सिमेवर असलेल्या सावरला या गावाला लागुन असलेल्या देऊळगाव त.ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर येथील अतिशय गरिब शेतकरी कुशन आत्माराम अवसरे वय ५५वर्ष सकाळी १० वाजताच्या सुमारास आपले स्वत:चे गुरे चारण्यासाठी कनलच्या पाळीला चारत असतांना अचानक वाघीन आपल्या तिन पिल्यासोबत तिथे आली व गुरे चारत असलेल्या गुराख्याला जागीच ठार केले एवढेच नाही तर त्याला ओढत ओढत भंडारा जिह्याच्या सिमेत आणले हि घटना दिनांक १/९/ २०२४ ला दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली हि बातमी वाऱ्यासारखी पसरली परंतु जिथे वाघीनने मारले त्या ठिकाणी प्रेत नव्हते ते प्रेत जवळपास दोन कि.मी.अंतरावर सावरला गावाच्या हद्दीत आणून ठेवले संबंधित घटनेची माहिती वन विभागाला व पवनी पोलीस स्टेशनला देण्यात आली व तिथे लोकांची गर्दी झाली तिन तासानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी पवनी येथे आणण्यात आले .त्याला तिन मुले असुन मुख्य व्यवसाय शेती हाच आहे त्याला वनविभाग भंडारा कडुन आर्थिक मदत दहा लाखाचा चेक व अंत्यविधी करिता विस हजार रू रोख देण्यात आले सदर घटनेचा तपास सहाय्यक पि आय.प्रितम येवले ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत यावेळी वन विभागाचे ए. सी.एफ .निलख,ए.सी.एफ.मेंढे,आर.एफ ओ.नागदेवे , आर.एफ ओ.ठोंबरे वन्यजीवचे लहू ठोकळ आर.ओ.ईश्वर काटेखाये,आर.ओ.घुगे.मंजलवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.