सामाजिक
मानवतेचे दर्शन घडवणारा उत्सव बैलपोळा आनंदाची पर्वणीच*
पवनी : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. हा सण *मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळा* तर्फे अत्यंत उत्साहात सर्व *शेतकरी बांधवांना शाल व नारळ* देऊन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट, सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही बेलघाटा वॉर्ड पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती.