नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार*
*नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार*
विलास केजरकर भंडारा.
भंडारा : नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून ५ सप्टेंबर रोजी स्वीकारला.
डॉ. संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्पूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजना मुख्यालय नागपूर येथे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.
डॉ. संजय कोलते यांना निवासी उपजिल्हाधिकारी धुळे पदावर कार्यरत असतांना जनगणनेविषयक उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले आहे. तसेच उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असतांना पोषण अभियान २०१८ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहे.
१९९४ मध्ये राज्य प्रशासकीय सेवेद्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जळगाव, नाशिक, धुळे, मुंबई, पुणे येथे विविध पदांवर काम केले. त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.
भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते नियुक्त झाल्याने जिल्ह्यातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.