भंडारा जिल्ह्यात बीएसएनएल सिमचा तुटवडा
कनेक्टिंग इंडियाच स्वप्न धुळीस मिळणार
भंडारा: चार जुलैपासून इतर दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज दर वाढवल्याने पवनी सह भंडारा जिल्ह्यात जिकडेतिकडे बीएसएनएल सिम ची मागणी असल्याने संपूर्ण पवनी तालुक्यात बीएसएनएल चे सिम कार्ड उपलब्ध नाही त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत आहे कनेक्टिंग इंडियाची जाहिरात भरपूर प्रमाणात केली जाते. दिनांक एक जुलै पासून मागणी वाढली आहे सध्या मार्केटमध्ये बीएसएनएल सिम च्या मागणी असल्याने फोर जी चे सुद्धा सिम उपलब्ध होत नाही. बीएसएनएलच्या सिम च्या काळाबाजार तर होत नाही अशी शंका ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे या संदर्भात फ्रेंचाईसी निरंजन शहारे यांना विचारले असता बीएसएनएलच्या विभागाकडून आम्हाला सिम उपलब्ध होत नाही त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ग्राहकांना सिम पुरवठा करू शकत नाहीअसे सांगितले. बीएसएनएल च सिम उपलब्ध करून द्यावे अशी जनतेची मागणी आहे. नाहीतर सिम सिम बीएसएनएल खुलजा असे म्हणावे लागेल.