- सापांना जीवदान द्या – सर्पमित्र वनिता बोराडे .
वार्ताहर केशव सातपुते (बुलढाणा)
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे, बाल गणेश मंडळाच्या वतीने 8 सप्टेंबरला राम मंदिरासमोरील सभागृहामध्ये जगातील पहिल्या सर्पमित्र वनिता बोराडे यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शारदा महाजन, वनिता बोराडे, गायक डी भास्कर, अजय चौधरी हजर होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल गणेश मंडळाच्या वतीने सर्पमित्रांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गायक डी भास्कर यांनी बालकांना कविता म्हणून दाखविल्या तसेच सापाविषयी मार्गदर्शन करून माणसाच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते दूर केले, त्यानंतर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी साथ दिल्यानंतर त्याला मारण्याची जीवदान देणे आवश्यक आहे असे सांगितले, साप हा माणसाचा शत्रू नसतो शेतकऱ्याचा एक चांगल्या प्रकारचा मित्र आहे याबाबत सविस्तर समजावून सांगितले. प्रत्येक साप हा विषारी नसून साप चावल्यानंतर त्वरित सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला, सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून, प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन विनोद सातपुते यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, या छोट्याशा बालकांनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे, गावकऱ्यांनी या बाल गणेश मंडळाचे कौतुक केले ..