प्राची चटप ची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- तालुक्यातील खमारी बुटी येथील रहिवासी दुर्गा चटप हिची मुलगी कु. प्राची केशव चटप हीने प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून आट्यापाट्या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. ती महाराष्ट्र चमूची कर्णधार असतांना महाराष्ट्र संघाला दोन सिल्वर पदक व अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. याच माध्यमातून तीची ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ती भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात बि.ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.
प्राची चटपने आपल्या निवडीचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, सचिव डॉ. दिपक कवीश्वर, डॉ. अमरकांत चकोले, कोच व मार्गदर्शक श्याम देशमुख. संस्था सचिव डॉ. ललीत जीवानी, पुज्य सिंधी समाज अध्यक्ष जैकी रावलानी तसेच आई दुर्गा चटप हिला दिले असुन प्राची चटपचे खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजेंद्र जैन, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, सुनिल फुंडे, एकविध संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, लवकुश निर्वाण, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव पवार, रोमी बिष्ट, डॉ. मनिष बतरा, किसन शेंडे, जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, समीर नवाज, धनंजय बिरणवार, ओमकार शेंडे, प्रशांत बोरकर, राहुल मेश्राम, प्रशांत खोब्रागडे, विनोद बांते, डॉ. काटपताळ, ओ. एल. चोले, अंकुश हलमारे, भंडारा क्रीडा व युवक मंडळांच्या सर्व पदाधिकारी, खेळाडू तसेच जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.