ईतर

संविधान मंदिराची निर्मिती म्हणजे लोकशाही रुजण्याचे माध्यम – मनोहर मेश्राम*

youtube
  1. *
    *आयटीआय कॉलेजमध्ये संपन्न कार्यक्रमात प्रतिपादन
    *पवनी/प्रतिनिधी*
    आज संपूर्ण महाराष्ट्रात सरकारतर्फे संविधान मंदिर निर्मितीचे कार्यक्रम घेण्यात आले असतांना पवनीमध्ये औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असलेले संपादक मनोहर मेश्राम यांनी संविधान मंदिराची निर्मिती हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे लोकशाही जनसामान्यांत रुजेल असे प्रतिपादन केले.
    ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेबांनी या देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या चतुरसूत्रीवर संविधान दिले. सरकार कोणाचेही असो याच घटनेच्या भरवशावर राज्य करावे लागते. मात्र संविधानाप्रति येथील सामान्य जनता अनभिज्ञ आहे. त्यामुळे शासनाने विविध सार्वजनिक ठिकाणी किंबहुना विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जागृती व्हावी म्हणून संविधान मंदिराचे केलेले उदघाटन जनतेचे हक्क आणि अधिकाराच्या जागृतीसाठी महत्वाचे ठरणार आहे असे सांगताना शासनाच्या सदर उपक्रमाची स्तुती केली. विद्यार्थ्यांना सल्ला देतांना ते म्हणाले लिखनेके लिये पडना होगा, पडनेके लिये लेखना होगा, किताबे तो बहुत पढे है तुमने, हक और अधिकार के लिये संविधान पढना होगा. म्हणून शासनाने संविधानाच्या जागरसाठी संविधान मंदिराची केलेली निर्मिती सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे सांगतांना प्रत्येकाने संविधान वाचावे असे म्हणाले.
    औदयोगिक प्रशिक्षण संस्था पवनी येथे संविधान मंदिराचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा, प्रफुल्ल पटेल, प्रशांत पडोळे, डॉ. परिणय फुके, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, आम. नरेंद्र भोंडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला प्रत्यक्षात गंगाधरराव जिभकाटे जी. प. अध्यक्ष, तहसीलदार महेंद्र सोनोने, राजेश घाडगे अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक, ऍड. शरद सावरकर, ऍड. देविदास तुळसकर, प्राचार्य पिसे मॅडम, संपादक मनोहर मेश्राम, पत्रकार महादेव शिवरकर, लियाकत अली, हरिश्चंद्र भाजीपाले, संदीप नंदरधने, दुगदेव तिमांडे इत्यादी उपस्थित होते. दरम्यान औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध उपक्रमाची पाहणी करण्यात आली. संस्थेची प्रगती होत असल्याने उपस्थित पाहुण्यांनी प्राचार्य श्रीमती पिसे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला. स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
    कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. किशोर शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आयटीआय तर्फे मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close