वैनगंगा विद्यालयात नवमतदार जनजागृती रॅलीचे आयोजन पवनी: स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व स्वीप कार्यक्रम तहसील पवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने नव मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन दिनांक 12 ऑगस्ट ला करण्यात आले. याप्रसंगी न्याय तहसीलदार शुभदा दुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य पराग टेंभेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही रॅली पवनी शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये घोषवाक्यद्वारे नव मतदारांना नोंदणीसाठी जनजागृती करण्यात आली याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मुस्तफा बेग शारीरिक शिक्षक प्रमोद मेश्राम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Related Articles
Check Also
Close