वैनगंगा विद्यालयात स्वातंत्र्यदिन
विज्ञान मंडळातर्फे विज्ञान प्रदर्शनी, गुणवंतांचा सत्कार,बक्षीस वितरण
पवनी स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, वैनगंगा पब्लिक तथा ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सर्वप्रथम वैनगंगा शिक्षण संस्थेचे सचिव विनोद मेंढे, संचालिका भावना तर्वेकर, संचालिका कुंदा आकरे प्राचार्य पराग टेंभेकर उपमुख्याध्यापक अजय ठवरे वैनगंगा पब्लिक ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या मयुरी वैद्य पब्लिक स्कूलच्या लीना कोरेकर यांनी भारत मातेच्या व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले वैनगंगा शिक्षण संस्थेचे सचिव विनोद मेंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विज्ञान मंडळातर्फे विज्ञान प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे समूहगीत सादर करण्यात आले मान्यवरांनी मार्गदर्शन केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वैशाली जीवनतारे आभार प्रदर्शन सहा. शिक्षक भोजराज दिघोरे यांनी केले याप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माजी शिक्षक वृंद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.