सामाजिक
स्काऊट गाईडच्या नेतृत्वामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन
श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग
भंडारा जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या अंतर्गत श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईडच्या नेतृत्वामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन 31 ऑगस्ट 2024 शनिवारला केले होते त्याप्रसंगी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती वर नृत्य गांधी चौकात सादर केले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर नाटिका प्रस्तुत केली म. गांधी चौक येथील वाहतूक स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यानी नियंत्रित केली.