मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन (01 सप्टेंबर 1990)*
*मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन (01 सप्टेंबर 1990)*
बहुजन समाजाला अंतर्मुख करायला लावणारी पुरोगामी विचारसरणीची ज्वलंत चळवळ आज ‘मराठा सेवा संघाच्या माध्यमातून’ नेत्रदीपक वाटचाल करत आहे.
अज्ञानाचा बुरखा फाडत अंधश्रद्धा निर्मूलन,0कर्मकांड, विविध
सामाजिक प्रश्नांची सोडवणूक मराठा सेवा संघाच्या 33 कक्षांतर्गत करत बहुजनाचा आधारवड झालेली चळवळ आज दखलपात्र ठरली आहे.
मन,मनगट,मेंदू सशक्तीकरणासह पायाच्या बुटपाॅलीशपासून ते डोकयाच्या तेलमालीशपर्यंत लाज न बाळगता उदयोग व्यावसाय तरूणांनी केला पाहीजे हा मंत्र ‘संस्थापक अध्यक्ष युगपुरूष पुरूषोत्तमजी खेडेकर’ साहेबांनी दिला.
यातून अनेक तरूण घडले व घडण्याची प्रक्रिया निरंतर चालूच आहे.
धर्मसत्ता, प्रचारप्रसार माध्यमसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता या पाच महत्वाच्या सत्ता बहुजन समाजाच्या हाती असावी हे ध्येय बाळगून चळवळ कार्यरत आहे.
या चळवळीच्या 34व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना हार्दिक सदिच्छा…!!
===== अनिल भुसारी =====
विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ
तुमसर, जि. भंडारा