महिला समाज विद्यालयाच्या मतदार जागृती रॅलीने दुमदुमले शहर
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे व परिसर स्वच्छता याकरिता जन जागृती करून मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!, जना मनाचा पुकार, मतदान आपला अधिकार!, चला मतदान करू या, लोकशाही बळकट करु या! व ना जातीवर, ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर, युवा हो तुम देश की शान, जागो उठो करो मतदान, आपल्या मताची ताकद ओळखू या, मतदान आमचा हक्क आहे, आम्ही तो बजावणार, आमच्यासाठी नेता निवडून, आम्ही देश घडविणार
…अशा घोषणा देत महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती करण्यासाठी रॅली काढली. या रॅलीला महिला समाज संस्थेच्या उपाध्यक्ष वर्षा कोलते व प्राचार्या वैशाली धारस्कर यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
रॅलीला महिला समाज संस्थेच्या अध्यक्षा विशाखा गुप्तेसह पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. ही रॅली महिला समाज प्राथमिक शाळा ते गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. परत महिला समाज शाळेत येऊन समारोप करण्यार आला. महिला समाज शाळेच्या विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी
*ताई, बाई,अक्का*
*विचार करा पक्का अन्*
*मतदानापासून वंचित राहू नका*
अशा घोषणांनी गांधी चौक दुमदुमला
होता. या रॅलीने महिला, पुरुष , युवा मतदार, वृद्ध नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. तर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी टिशा मळकाम, दिया खांबाळे, माही मोटघरे, वृषाली शेंडे, माधवी गाढवे, मृणाली चव्हाण, सुमेधा कारेमोरे या विद्यार्थीनींनी पथनाट्य व जनजागृती गित सादर करून मतदारांना जागृत करण्यासाठी व आरोग्य आणि स्वच्छता या विषयी जनजागृती केली.
याकरिता वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद सेलोकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुप्रिया भुते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनिता निनावे, रंजू धाबेकर, वैशाली माहुरकर, विपीन लाखे, नितीन नवखरे, विजया बालपांडे, वैशाली वैद्य, शितल सार्वे, राजेंद्र हेडाऊ, राजेंद्र मेश्राम, संजय भेदे, तनिष्का बेनिबागडे, मानसी थोटे, वैष्णवी साखरकर, ऋतू नगरधने, आशिष मेघरे, इशिका माकडे तसेच महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यी- विद्यार्थ्यींनीं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.