वैनगंगा विद्यालयात स्वयंशासनाचा उपक्रम घेऊन शिक्षकदिन साजरा
स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन तसेच संत चक्रधर स्वामी यांची जयंती दिनांक ५ सप्टेंबरला साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, संचालिका भावना तर्वेकर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रकाश नखाते, सतीश लेपसे, डॉ. श्रीकांत चांदेवार ,नरेंद्र भांडारकर ,किशोर भांडारकर, विद्यालयाचे प्राचार्य पराग टेंभेकर ,उपप्राचार्य अजय ठवरे यांनी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रकाश नखाते व वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . स्वयंशासन या उपक्रमांतर्गत एकदिवसीय प्राचार्य भावेश पडोळे उपप्राचार्य तन्मय बावनकर यांनी स्वयंशासनाचे प्रशासन उत्कृष्टरित्या सांभाळले कार्यक्रमाचे संचालन वर्ग १० ची विद्यार्थिनी आदिश्री हूमे हिने तर आभार प्रदर्शन वर्ग १० ड विद्यार्थिनी स्वर्णाली जीवनतारे हिने केले स्वयंशासन या उपक्रमांतर्गत सुमारे 80 विद्यार्थ्यांनी शिक्षक,बाबू , चपराशी अश्या विविध भूमिका पार पाडल्या. ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अध्यापन कार्य केले त्यांना विद्यालयाचे प्राचार्य पराग टेंभेकर यांनी पारितोषिक देवून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिक्षक संजय लेदे , प्रदीप घाडगे ,भोजराज दिघोरे, महादेव पचारे, कुणाल बोरकर आमिष बावनकुळे, अध्यापिका उर्मिला वाघमारे वैशाली जीवनतारे ,रजनी तेलमासरे तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.