वैनगंगा विद्यालयातील स्काऊट गाईड तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिन
पवनी स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट आणि गाईडस् च्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन दिनांक १२ ऑगस्टला साजरा करण्यात आला
याप्रसंगी भारतीय स्काऊट आणि गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पराग टेंभेकर स्काऊट मास्तर प्रदीप घाडगे यांनी माल्यार्पण केले विद्यार्थ्यांनी युवादिनाचे औचित्य साधून युवांच्या समस्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पराग टेंभेकर यांनी उपस्थित सर्व युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नशा मुक्तीची शपथ स्काऊट मास्तर प्रदीप घाडगे यांनी दिली कार्यक्रमाचे संचलन गाईड कु. स्वराली जिवनतारे तर आभार प्रदर्शन गाईड कुमारी आदिश्री हुमे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गाईड शिक्षिका एस के गंडाटे गाईड शिक्षिका यु एच वाघमारे शिक्षक भोजराज दिघोरे, प्रदीप घाडगे यांनी सहकार्य केले.