शैक्षणिक
वैनगंगा विद्यालयातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन
पवनी :भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण ७७वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच जनतेच्या मनात राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणे व राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करण्यासाठी स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने तिरंगा रॅलीचे आयोजन दिनांक १२ ऑगस्टला करण्यात आले होते. ्प्राचार्य पराग टेंभेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीचे उद्घाटन केले या रॅलीमध्ये वर्ग ९ चे विद्यार्थी यांनी २५ फूट मोठा राष्ट्रध्वज घेऊन शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली होती