शैक्षणिक
विद्यार्थी बनले शिक्षक
सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम.
- विद्यार्थी बनले शिक्षक
सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम.
पवनी:-५/ सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३६ वी.जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.विद्यार्थी शिकत असताना जबाबदारीची जाणीव व्हावी तसेच शिक्षकांचे कष्ट समजावेत या हेतूने शालेय स्तरावर स्वयंशासन दिन साजरा केला जातो.यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे.स्क्वयंशासन दिनातील सहभाग केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून भविष्याला आकार देणणारी रुची,कला दर्शविणारे एक प्रतीक असते.
मुख्याध्यापक,शिक्षक, लिपिक,सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एक दिवसीय अनुभव आणि आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो.म्हणून विद्यार्थ्यी ही आठवण आयुष्यभर जपतो.यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथम शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सापडली.मुख्याध्यापिका म्हणून सानिया शेख तसेच शिक्षक म्हणून राधिका सानगडीकर, तायरा शेख,मुस्कान शेख, मानवी रामटेके,अक्षरा भोवते,अनुश्री लोणारे, प्राजक्ता लोणारे,सानिया रामटेके,अलिझा हुसेन, जिया घुगुसकर,पंखुडी मांढरे,मादिया बेग,आयुष रामटेके,तर शिपाई म्हणून कुणाल पचारे,विराज राऊत,निमेश धुरई,गौरव नागपूरकर यांनी दिवसभर अध्यापक ते शालेय कामकाजाची पाहणी केली.डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच शाळेत कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.स्ययंशासन दिनाचे नियोजन उपक्रमशील शिक्षक अशोक गिरी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरुणा कांबळे,भावना निमजे, चित्रा धकाते,निता मोटघरे,मयुरी मानापुरे, प्रणय धुरई यांनी मोलाचे सहकार्य केले.